Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठ : ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने ५ जानेवारी पासून सुरू होणार असून ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक आहे.

कला, विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांतर्गत सत्र- २, ४ व ६ या सत्रातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यु स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा यासाठी ४ जानेवरी पर्यंत विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक आहे. https://nmu.unionline.in या संकेतस्थळावर ही मॉकटेस्ट देता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लॉगइन करीता युजरनेम म्हणून पीआरएन नंबर टाकावा व त्यानंतर पासवर्ड म्हणून जन्मतारीख DDMMYY या स्वरूपात नमूद करावी. सराव परीक्षेत लॉगइन झाल्यानंतर आपली शाखा निवडावी त्यानंतर अभ्यासक्रम निवडावा व त्या दिवसी वेळापत्रकानुसार जो विषय असेल तो निवडावा. प्रश्नाचे उत्तर निवडताना A B C D समोरील रेडीओ बटनवर क्लिक करावे. या पध्दतीने परीक्षा दिली तर कोणती ही अडचण निर्माण होणार नाही. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयात नेमणूक करण्यात आलेल्या परीक्षा समन्वयकाशी संपर्क साधावा. या परीक्षे संदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर January-2021 Examination या लिंकवर http://nmu.ac.in/examination.aspx येथे उपलब्ध आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

Exit mobile version