Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठीय अशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपावरील त्वरीत तोडगा काढवा; अभाविपचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील विद्यापीठ परीक्षेच्या तोंडावर अशासकीय कर्मचारी संघटनांच्या होत असलेल्या संपावर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयीन-विद्यापिठांच्या परिक्षांचे सत्र सुरू असून त्याला एक महत्व आहे. ऐन परिक्षा कालखंडात आलेल्या कोरोनाच्या व त्यानंतरचे लॉकडाऊन यामुळे परिक्षा होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतू विद्यार्थ्यांचे बघत अंतिम परिक्षा होणे आवश्यक आहेत. त्यामुळे सध्या परिक्षा राज्यात सुरू आहे. परंतू आपल्या विविध मागण्यांना घेवून महाविद्याल आणि विद्यापीठ अशासकीय कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठ प्रशासन सुरळीत चालण्यासाठी सर्व कर्मचारी वर्गाचे मोठे योगदान असते. त्यामुळे या आंदोलनामुळे परिक्षांवर परिणाम होवून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता अशासकीय कर्मचारी संघटनांच्या विविध रास्त मागण्यांसाठी मंत्री महोदय यांनी त्वरित तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अभिविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ, प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे, विदर्भ प्रदेश मंत्री रवी दांडगे, कोकण मंत्री प्रेरणा पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Exit mobile version