Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठातील पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या वतीने राज्यस्तरीय वेबिनार

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २६ जुलै ‘अपप्रचार आणि वस्तुस्थिती शोधन’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग आणि युनिसेफ यांच्या दरम्यान झालेल्या करारार्तंगत हा वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.  वेबिनारचे उद्घाटन दि. २६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा.डॉ. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. या वेबिनारमध्ये युनिसेफच्या माध्यम सल्लागार श्रुती गणपत्ये आणि इंदौर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालयाच्या जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. सोनाली नरगुन्दे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युनिसेफचे संवाद विशेषतज्ज्ञ स्वाती महोपात्रा उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे असून वेबिनारचे मुख्य आयोजक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर तर सह आयोजक डॉ. विनोद निताळे, डॉ.गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे हे आहेत.

या वेबिनारमध्ये सोशल मीडियावरील फेक न्यूज कशा ओळखाव्या, त्याचे प्रकार आणि स्वरुप त्याचबरोबर अपप्रचाराचे तंत्र आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचे तंत्र याविषयी विस्ताराने मार्गदशन करण्यात येणार आहे. हा राज्यस्तरीय वेबिनार झूम अँप वर घेण्यात येणार आहे. वेबिनार सर्वासाठी नि:शुल्क असून यात सहभागी होण्यासाठी  झूम आयडी 9199436597 व mcj111 हा पासवर्ड वापरून लॉगीन करता येईल. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी वेबिनारचे मुख्य आयोजक तथा विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर (८४०७९२२४०४) डॉ.विनोद निताळे (९८६००४६७०६) अथवा विभागात कार्यालयीन वेळेत ०२५७-२२५७४३६, २२५७४३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागप्रमुख यांनी केले आहे.

 

Exit mobile version