विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाला धारेवर धरले!

जळगाव, प्रतिनिधी | विद्यापीठात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविषयी आज महा विकास आघाडी पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाच्या विविध प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या दालनात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले. व मागील दिलेले निवेदन व त्यांची न मिळालेली उत्तरेबाबत जाब विचारला.

विद्यापीठांमध्ये सध्या सुरू असलेल्या विविध कामांच्या ठेक्याची मुदत मागील ३० डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आलेली असताना, देखील आज तब्बल बावीस दिवस वरती होऊन देखील विद्यापीठ प्रशासनाने त्या कामाचे नवीन कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही ठेकेदाराला दिले नाही.

मागील अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या त्या एकाच ठेकेदाराला पुन्हा काम देण्याकरता व त्या कामाचे डिपॉझिट रक्कम ची जुळवाजुळव करण्या करता पुन्हा त्याच ठेकेदाराला तब्बल बावीस दिवस उलटल्यानंतर देखील डिपॉझिट जमा करण्याची मुदत लाडक्या ठेकेदाराला दिली जाते व विद्यापीठातील विकास कामांसाठी कोणताही नवीन ठेकेदार विद्यापीठ शोधत नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामागील नेमकं कारण काय..? याचा शोध घेणे देखील महत्त्वाचे असणार आहे..

विद्यापीठ कुलगुरू पदाची मुदत देखील संपुष्टात येत आहे. नवीन कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली असताना आता विधिमंडळामध्ये विद्यापीठ कायदा मधील सुधारणा करीत काही महत्त्वाचे बदल महाराष्ट्र राज्य सरकारने अधिवेशनाच्या काळात सर्वानुमते या नवीन विद्यापीठ सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे. महाविकास आघाडी पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी नवीन कुलगुरू यांची निवड ही नवीन कायद्यानुसारच व्हावी जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल अशी मागणी कुलगुरु यांच्या माध्यमातून राज्यपालांना देखील कळविले .

आगामी काळात नवनियुक्‍त कुलगुरु हे अतिशय योग्य चाचपणी काढून नियुक्त केले जातील, जेणेकरून विद्यापीठात सध्या सुरू असलेला भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊन दोषी लोकांना शासन होईल..

परंतु विद्यापीठातील काही ठराविक मंडळी की ज्यांचे हात मागील चार वर्षांपासून विद्यापीठ मधील वेगवेगळ्या भ्रष्टाचारामध्ये रुतलेले आहे अशी मंडळी विद्यापीठाचे कुलगुरू निवड प्रक्रिया ही जुन्या पद्धतीनेच व्हावी जेणेकरून आपल्या मर्जीतील कुलगुरू नियुक्त करता येतील यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर ती आज आवाज उठवण्याचा काम करण्यात आलं परंतु विद्यापीठातील सर्वच प्राधिकरणाचे अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे व त्यांच्या वरती कुठलातरी दबाव असल्यामुळे ते महाविकासआघाडी पक्षाच्या संघटनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ती कुठलेही उत्तर देऊ शकले नाही नेमका पडद्यामागील गोंधळ काय आहे..? हा संपूर्ण जनतेसमोर यायला हवा यासाठी आगामी काळामध्ये विद्यापीठ प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नसल्यामुळे महाविकासआघाडी पक्षाच्या तिघही संघटनांच्यावतीने हाय कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे..

याप्रसंगी सिनेट सदस्य विष्णू भंगाळे ,एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सचिव ऍड कुणाल पवार, युवा सेनेचे अभिजीत रंधे हे उपस्थित होते.

Protected Content