विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन होणार – कुलगुरू प्रा. माहेश्वरी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गेल्या दोन वर्षापासून कोविड-१९ च्या महामारी मुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत होत्या मात्र सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी पुढे सांगीतले की, विद्यापीठाब्दारे घेण्यात येणाऱ्या उन्हाळी २०२२ च्या लेखी परीक्षा बहुपर्यायी (MCQ) स्वरुपात ऑफलाईन पध्दतीने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. पदवीस्तरावर ६० गुणांची ही परीक्षा ९० मिनीटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल. या परीक्षेकरीता निगेटीव्ह मार्कीग पध्दत लागू राहणार नाही. पदव्युत्तर स्तरावर ६० गुणांची परीक्षा १२० मिनिटांची असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील व सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य असेल. या परीक्षेकरीता निगेटीव्ह माकींग पध्दत लागू राहणार नाही. बहिस्थ अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची परीक्षा १०० गुणांची व १२० मिनीटांची असेल. एकूण ५० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला २ गुण राहतील. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी ऑफलाईन घेण्यात येतील. प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे प्रचलित पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. अंतर्गत परीक्षा या देखील प्रचलित पध्दतीने शक्यतो दीर्घोत्तरी घेण्यात येतील. पुढील वर्षाच्या म्हणजे २०२२-२३ मधील हिवाळी व उन्हाळी परीक्षा या पूर्वीच्या प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी घेण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.

Protected Content