Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापिठात प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्त्यांची घोषणा

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी बुधवारी प्रभारी अधिष्ठांताच्या नियुक्तीचे आदेश काढले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून प्राचार्य आर. एस. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य पी. पी. छाजेड (पालेशा महाविद्यालय, धुळे), मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य पी. एम. पवार (धनदाई कला महाविद्यालय, अमळनेर), आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठातापदी प्राचार्य अशोक राणे (केसीईचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली.

या शिवाय विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून डॉ. एस. पी. शेखावत (बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव) व प्राचार्य व्ही. आर. पाटील (फार्मसी महाविद्यालय, फैजपूर) यांची आणि मानव विज्ञान विद्याशाखेचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून प्राचार्य बी. युवाकुमार रेड्डी (मणियार विधी महाविद्यालय, जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version