Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विदेशी निधी घेण्याचा भीम आर्मीशी संबंध नाही 

 

लखनऊ: वृत्तसंस्था । हाथरस परिसरात परिस्थिती चिघळवण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या विदेश फंडिगशी संबंधित माहिती तपास करणाऱ्या संस्थांना मिळाली आहे. मात्र संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वातील भीम आर्मी यांचे संबंध नसल्याचा खुलास सक्तवसुली संचालनालयाने केला आहे.

सीएएच्या विरोधात आंदोलन होत असताना तणाव निर्माण करण्याचा आरोप भीम आर्मीवर लावण्यात आला होता. चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कोणताही संबंध नाही, असे संक्तवसुली संचालनालयाने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगल पसरवण्यासाठी १०० कोटी रुपयांचे विदेश फंडिंग करण्यात आले होते असे एसआयटीला आढळले होते. नंतर पीएफआया संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

विदेशातून आलेले १०० कोटी रुपये आढळल्याचा दावा देखील चुकीचा असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे. भीम आर्मी आणि इतर संघटना हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची दिशाभूल करत आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक बृजलाल यांनी केल्यानंतर ईडीने हे स्पष्टीकरण दिले आहे.

भीम आर्मी, काँग्रेस आणि आप हे पक्ष हाथरसमझ्ये जातीय दंगे भडकावण्याच्या तयारीत होते आणि म्हणूनच पीडितेच्या पार्थिवावर रात्री घाईत अंत्यसंस्कार करण्यात आले, असाही दावा माजी पोलिस महासंचाकांनी केला होता.

पोलिसांनी ४ लोकांना अटक केली आहे. पीएफआयचे कथित संबंध असलेल्या या चौघांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी हाथरसला नेण्यात आले होते, असा दावा तपास करणाऱ्या पथकाने केला आहे. केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांच्यासह चौघांवर मथुरा येथे राजद्रोह आणि इतर आरोपांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सतत प्रतिक्रिया व्यक्त करणारी एक महिला बेपत्ता असल्याचे पीडित कुटुंबीयांची यादी तयार करत असताना आढळले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त आणखी २ तरुणही तेथे नव्हते. यानंतर पोलिसांचा संशय अधिकच बळावला होता.

Exit mobile version