Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विठोबा मिस्तरी विश्वकर्मा समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

भडगाव प्रतिनिधी । विश्वकर्मा प्रसाद मासिकातर्फे येथील विठोबा बळीराम मिस्तरी (वाडेकर ) यांना सुतार समाजाने विश्वकर्मा सुतार समाजभुषण पुरस्कार देऊन सन्मानित केले.

 

विठोबा वाडेकर हे समाजासाठी तत्पर हजर असतात. ते आता सध्या विश्वकर्मा सुतार समाज मंडळाचे भडगाव तालुका अध्यक्ष व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यांनी समाजासाठी भडगाव येथे विश्वकर्मा मंदीरासाठी समाजातुन देणगी जमा करून प्लॉट देखील घेतला. तसेच २०१४ साली त्यांनी सुतार समाज मंडळ जळगाव जिल्ह्याची प्रत्येक घरी जावुन सपूर्ण जळगाव जिल्ह्याची जणगणना केली आणि पुस्तीका छापुन प्रत्येक समाज बांधवापर्यत पोहचवली. कोरोना काळात त्यांनी गरीब बांधवांना १२५ किराणा कीट वाटप केले. तसेच सुतार समाजामधे विधवा, विधुर, असतील किंवा घटस्फोट झालेले बांधव असतील यांची माहीती गोळा करून त्या समाज बांधवासाठी विश्वकर्मा पुनर्विवाह ग्रप सुरु केला आहे. या गृपच्या सहाय्याने अनेक विवाह जुळण्यास मदत होत आहे. असे बरेच सामाजिक काम ते करत असतात. त्यांना सामाजिक कामामध्ये भडगाव येथील शिवाजी हरचंद वाडेकर, बालु देवराम वाडेकर, आणि सर्व समाज बांधव हे मदत करत असतात. ते श्री स्वामी समर्थ प्लायवुडचे संचालक आहेत. फार कमी कालावधीत त्यांनी फार मेहनत घेवुन फार मोठे साम्राज्य उभे केले आहे. त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा भावांचा, भाच्यांचा, पुतण्यांचापण समावेश आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना सुतार समाज समाजभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याचे सर्व समाज बांधवाकडून कौतुक केले जात आहे.

 

Exit mobile version