Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विटनेर येथे जप्त केलेल्या घरात राहणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गृहकर्ज घेवून परतफेड न केल्याने फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या घराचे कुलुप तोडून वास्तव्यास राहणाऱ्या दाम्पत्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुकलाल पुंडलिक परदेशी आणि संगिताबाई सुकलाल परदेशी रा. विटनेर ता.जि.जळगाव यांनी शहरातील शुभम हॉऊसिंग डेव्हलपर्स फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज म्हणून त्यांच्या नावे असलेले घर तारण ठेवून १४ लाख २० हजार २५ रूपयांचे कर्ज २९ सप्टेंबर २०१५ रोजी घेतले होते. त्यानंतर दोघांनी गृहकर्जाची परतफेड केली नाही. यासंदर्भात अनेक वेळा त्यांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या. त्यांचे आजपर्यंत २६ लाख २३ हजार ६२१ रूपये देणे बाकी आहे. त्यामुळे कायद्यान्वये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुभम हॉऊसिंग डेव्हलपर्स फायनान्स कंपनीने तारण केलेले ९ एप्रिल २०२१ रोजी मालमत्ता थकबाकी न भरल्यामुळे जप्त करून घराला सील लावण्यात आले होते. आज शुक्रवारी दुपारी २ वाजता कंपनीचे वसूली अधिकारी पंकज पांडे आणि आशिफ इकबाल हे भेट देण्यासाठी विटनेर येथे गेले. त्यावेळी सुकलाल परदेशी आणि संगिता परदेशी यांनी घराला कंपनीने लावलेले सील तोडून घरात वास्तव्याला असल्याचे दिसून आले. आशिफ इकबाल यांच्या फिर्यादीवरून जप्तीची मालमत्ता असतांना गृहअतिक्रमण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version