Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला वीज कर्मचार्‍यासह सहकार्‍यांना मारहाण: गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | वारंवार मागणी करूनही थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला वीज ग्राहकाने शिवीगाळ करत तिच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यास मारहाण केल्याची घटना गजानन वाडीत घडली.

याबाबत वृत्त असे की, शहरातील गजानन वाडीतील योगेश रमेश चौधरी या विज ग्राहकांकडे विज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीकडून वारंवार त्याला पैसे भरणा करण्याचे सांगण्यात आले. मात्र त्यांनी विज बिल भरले नाही. म्हणून २४ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास महावितरण कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन विज कनेक्शन खंडित करण्यासाठी गेले. मात्र विज ग्राहक योगेश रमेश चौधरी यांला विज कनेक्शन खंडित करत असल्याचे राग आल्याने त्यांनी महिला कर्मचारीला शिवीगाळ करून सहकारी शिरिष मराठे यांच्या कानाखाली वाजवली. व मारहाण केली. त्यामुळे योगेश चौधरी यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी योगेश रमेश चौधरी याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

Exit mobile version