Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजेचा धक्का लागल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणपती नगरातील ३८ वर्षीय महिलेला विजेचा धक्का लागल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवारी २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सगुना गोकुळ राठोड (वय-३८) रा. इच्छादेवी मंदिराजवळ, गणपती नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १३ डिसेंबर रोजी घरी महिला एकट्या असताना त्यांना विजेचा धक्का लागला. यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवार २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छदेन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Exit mobile version