विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे गायब ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी टळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या खटल्याची कागदपत्रे गायब झाल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी टाळली आहे.

 

विजय मल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे अवमान केल्याचा आरोप आहे. यावर माल्याने पुनर्विचार याचिका दाखल केलीय. यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने ही सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात जात त्याची संपत्ती कुटुंबियांच्या नावे केली होती. या प्रकरणी माल्ल्याने याचिका दाखल केली होती. तीन वर्षांपूर्वी मल्याने ही याचिका दाखल केली होती. दरम्यान, बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्यावर नऊ हजार कोटींचे कर्ज आहे.

Protected Content