Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजय मल्ल्याची १४ कोटींची मालमत्ता जप्त

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । विजय मल्ल्याची फ्रान्समधली १४ कोटींची मालमत्ता अमबलजावणी संचलनालयाने सांगितल्यानंतर फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.

स्टेट बँकेसह इतर बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्याची आता फ्रान्समधली मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. युरो १.६ मिलियन अर्थात सुमारे १४ कोटींची ही मालमत्ता आहे. फ्रान्समधल्या तपास यंत्रणांनी माहिती दिली आहे. आम्ही फ्रान्समधल्या तपास यंत्रणांना विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी कारवाई केली आहे असं ईडीने म्हटलं आहे.

विजय मल्ल्याची 32 Avenue FOCH या ठिकाणी असलेली मालमत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. विजय मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. जानेवारी २०१९ मध्ये विजय मल्ल्याला मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट अंतर्गत कोर्टाने फरार आरोपी घोषित केले होते. मार्च २०१९ पासून तो लंडनमध्ये राहतो आहे. भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करतं आहे.

Exit mobile version