Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विघ्नहर्ता हॉस्पीटलमध्ये सुधारित महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पीटलमध्ये सुधारित महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली असून यामुळे आता बहुतांश आजारांवर मोफत उपचार होणार आहेत.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेसाठी विविध प्रकारच्या १२०० आजारावर महाराष्ट्र राज्य – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना योजना अंतर्गत शासनाच्या नवीन आदेशानुसार सोमवार दिनांक २५ मे २०२० पासुन समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन आजारांवर उपचार करण्याची सुविधा पाचोरा येथिल विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा सर्वच नागरिकांना लाभ घेता येणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या या जनहित निर्णयामुळे राज्यातील संपूर्ण १२ कोटी जनतेला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या आजारामध्ये-
महिलांसाठी१) गर्भपिशवीचे टाके व दुर्बीण द्वारे ऑपरेशन,२) अपेंडिक्स,३) हार्निया,४)पित्ताशय
५) थायरॉईड या आजारांचा नव्याने समावेश करण्यात आला असून यापुर्वी योजनेत सुरु असलेले १) अ‍ॅन्जीओप्लास्टी व अ‍ॅन्जीओग्राफी
२) हाडांचे व मणक्यांचे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया
३) नवजात जन्मलेल्या बालकांचे सर्व उपचार
४) मुतखड्याचे शस्त्रक्रिया व डायलेसिस
५) श्‍वसन संबंधीचे सर्व आजार
६) लिव्हर व स्वादु पिंडाचे आजार
७) मेंदुच्या शस्त्रक्रिया

आदींसह अन्य व्याधींचे मोफत निदान व उपचार करण्यात येणार आहे. ही सुविधा पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करून मिळणार आहे. राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे मंत्री ना.राजेश टोपे यांनी १ मे महाराष्ट्र दिनी वरील घोषणा केली होती आज प्रत्यक्षात आदेश निघून वाढीव आजारांसह योजनेला सुरवात करण्यात आली आहे. रूग्णांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा व आपल्याला असलेले वरील व्याधी आणि रोगांवर अचुक व मोफत उपचार करून घ्यावे असे आवाहन हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-०२५९६ – २४४००४, ९३०७४०४८९२ देण्यात आले आहे.

Exit mobile version