Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विक्रेत्याच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मयूर हॉटेलसमोर अंडापाव विक्रेत्याला पैसे मागण्याच्या कारणावरून तीन जणांनी शिवीगाळ करून दारूची बाटली डोक्यावर फोडून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी २२ नोव्हेंबर दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ईश्वर संतोष साळुंखे (वय-४६, रा. दिनकर नगर, आसोदा रोड, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील मयूर हॉटेलसमोर त्यांचे अंडा पाव विक्रीची गाडी असून त्यावर त्यांचा उतरनिर्वाह करतात. सोमवारी 21 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पंकज ( पूर्ण नाव माहित नाही), जितू (पूर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी असे तीन जण त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. पैसे मागितल्यानंतर ईश्वर साळुंखे यांनी पैसे देण्यास नकार दिला, याचा राग आल्याने तिघांपैकी एकाने हातातील काचेची दारूची बाटली ईश्वर साळुंखे यांच्या डोक्यात टाकली, त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, या प्रकारानंतर मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता ईश्वर साळुंखे यांनी दिलेल्या जबाबावरून तीन जणांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीसहेड कॉन्स्टेबल निलेश भावसार करीत आहे.

Exit mobile version