Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाहन चालकाचा वाहतूक पोलीसाला चावा; पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी। वाहन चुकीच्या बाजूने नेवून चौकात उभ्या वाहतूक पोलिसांच्या अंगावर भरधाव वेगाने नेल्याची थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर कारवाईसाठी पोलिसांनी वाहन थांबविले असता, चारचाकीतील चालकाने धिंगाणा घालत दोन वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांचे कपडे फाडले. एवढ्यावरच हा चालक जुमानला नाही तर त्याने चक्क प्रशांत विलास मोरे या वाहतूक पोलिसाच्या दोन्ही पायाला चावा घेवून त्यांना जखमी केल्याचीही धक्कादायक प्रकार यावेळी घडला.

यानंतर पोलीस निरिक्षकांसह कर्मचार्‍यांनी सदरच्या चालकाला ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. दिपक प्रल्हाद बिर्‍हाडे (वय 32) समतानगर असे चालकाचे नाव आहे.  आकाशवाणी चौकात पंडित साळी, प्रशांत मोरे, गणेश पाटील, शशीकांत मोरे हे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी डयूटी बजावत होते. दरम्यान कटक येथून महेंद्र बोलेरो गाडी घेत (क्रमांक एम.एच. 47 पी.सी. 264) पोहच करण्यासाठी चालक दिपक प्रल्हाद बिर्‍हाडे हा नाशिककडे जात होता. इच्छादेवी चौकातून अजिंठा चौकात त्याने भरधाव वेगात वाहन आणून आकाशवाणी चौकात दत्तमंदिराकडे रॉँगसाईडला वळविले. त्यानंतर पुन्हा रॉँगसाईडने आकाशवाणी चौकाकडे वाहन नेण्याचा प्रयत्न करत असताना त्याने दोन ते तीन वाहन चालकांना कट मारला. तसेच याठिकाणच्या पोलिसांच्या अंगावरही वाहन नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर कर्मचारी प्रशांत विलास मोरे तसेच पंडित साळी यांनी तत्काळ त्याला रोखले.

जाब विचारताच त्याने पोलिसांशी वाद घातला. वादादरम्यान तो प्रशांत मोरे व पंडीत साळी यांच्या अंगावर धावून गेला. झटापटीत त्याने मोरे तसेच साळी यांचे गणवेश फाडला. यानंतर कर्मचार्‍यांच्या अंगावर माती फेकून मोरे यांच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी चावा घेत जखमी केले. घटना कळताच पोलीस निरीक्षक देविदास कुनगर सेच कर्मचारी, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी आकाशवाणी चौकात धाव घेतली. तीन ते चार कर्मचार्‍यांनी त्या पकडले. व पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणले. त्याच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

Exit mobile version