Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाहनाच्या धडकेत वृध्द जखमी : एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील आर,एल चौफुली परिसरात तोलकाट्यासमोर वृध्दाला वाहनाने धडक देवून जखमी केल्याप्रकरणी गुरुवार, १९ मे रोजी एमआयडीसी पोलिसात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी दत्तात्रय निंबाजी न्हावी (वय ६१) हे १५ मे रोजी सायंकाळी पायी जळगाव शहरातील आर.एल.चौफुली परिसरात गेले होते. यादरम्यान पायी चालत असतांना जळगाव तोलकाट्यासमोर अज्ञात वाहनाने दत्तात्रय न्हावी यांना धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेत दत्तात्रय न्हावी यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुरुवारी जखमी दत्तात्रय न्हावी यांचा मुलगा दिपक चौधरी याने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version