Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरात चौका चौकात गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले, यातच काही वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा स्वरुपात उभी केली होती. अशा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या   वाहनांवर वाहतूक शाखेतर्फे जप्तीची कारवाई करण्यात आली. 

शहरातील फुले मार्केट परिसरात नागरिकांची सकाळी गर्दी झाली होती. यावेळी रस्त्याने जातांना वाहतुकीस अडथळा निर्माण करतील अशा पद्धतीने फुले मार्केटजवळ रस्त्याच्याकडे लावण्यात आली होती. काही नागरिकांनी आपल्या गाड्या पार्किंगमध्ये न लावता रस्त्यावर उभी केली होती.  या वाहनांचा रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने ही  वाहने पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली जप्त व दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर काही नागरिकांनी घटनास्थळी मेमो घेऊन आपली वाहने ताब्यात घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील यांनी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहन पार्किंगमध्येच उभी करावीत असे आवाहन केले.

 

 

 

Exit mobile version