Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाहतुकीच्या नियमांची अनाऊंसमेंटद्वारे जनजागृती

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मॉर्निंग वॉक मधील होणारे रस्ते अपघात आळा बसावा याकरिता बुलढाणा आरटीओ विभागाच्या वतीने रस्त्यावर अनाऊंसमेंट करित पादचारी व मॉर्निंग करणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

 

सध्या थंडीचे दिवस आणि त्यातील सध्या मॉर्निंग वॉकला अग्रक्रम दिला जातो. पण सकाळी तरुण, वृद्ध मंडळी मॉर्निंग वॉकला जाताना शहराबाहेर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा अपघातात ते बळी पडतात. पण या करता बुलढाणा प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रोज सकाळीच्या मार्गावर पोलीस भरती करिता युवा वर्ग किंवा मॉर्निंग वॉक करतात वृद्ध व्यक्ती घराबाहेर पडतात त्यांना योग्य ते काळजी घेण्याकरिता अनाउन्समेंट करून बुलढाणा प्रादेशिक विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे.

हिवाळ्यामध्ये प्रामुख्या सकाळी मॉर्निंग वाक करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्याच बरोबर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. रस्ते अरुंद होत चाललेली आहे… अश्यातच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविल्या जात असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी बुलढाणा आरटीओ यांनी अनाऊंसमेंट करित पादचारी व मॉर्निंग वाक करणाऱ्याना सूचना दिल्या जात आहेत. मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांनी व पोलिस भरती करिता धावण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्याने धावताना उजव्या बाजूचा वापर करावा तसेच काळे  कपडे न वापरता अंधारात दिसतील अशा रिफ्लेक्टिव मार्क असणाऱ्या कपड्यांचा ( पांढरा , लाल, पिवळा) वापर करावा. अश्या सूचना रोज सकाळी दिल्या जात आहे… त्यामुळे शिस्तीचे पालन करून आपला जीव वाचवा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Exit mobile version