Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू भरलेल्या टिप्परची धडक ; एकाच कुटुंबातील तीनजण ठार

बीड (वृत्तसंस्था) अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथे वाळू भरलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीनजण ठार झाले आहेत.

 

नागनाथ महादेव गायके, वसंत जनार्धन गायके आणि विठ्ठल मुंजाजी गायके अशी मयत व्यक्तींची नावं आहेत. अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथे रात्री १०च्या सुमारास हा अपघात घडला. हे तिघेही जण बाईकने चालले असताना रात्रीच्या अंधारात टिप्पर चालकाला दिसले नाही आणि बाईकशी जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये बाईकवर असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अवैध वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Exit mobile version