Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळूने भरलेला ट्रक पाठलाग करून पकडला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील रस्त्यावरून बेकायदेशीरपणे व चोरटी वाळूची वाहतूक करणारा ट्रक प्रांताधिकारी पाठलाग करून पकडल्याची घटना शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. पुढील कारवाईसाठी महसूल विभागाने वाळूने भरलेला ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने नेण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरटी वाळूमाफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात वाळूची मोठी तस्करी केली जात आहे. यात तापी आणि गिरणा नदीतून मोठा वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर केली जाते. रात्री अपरात्री देखील ट्रॅक्टर व इतर वाहनातून चोरटी वाहतूक होत असते. शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बांभोरी गावाकडून वाळूने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच ०४ बीजी ४२७१) जळगाव शहरातून जात मोहाडी रोडने जात असल्याची गोपनिय माहिती प्रांताधिकारी महेश सुधळकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह मोहाडी रोडवर वाळूने भरलेल्या ट्रकचा पाठलाग केला. दौलतनगर जवळ महसूल पथकाने ट्रक पकडला. वाहनचालकाला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता. ट्रकचालकाकडे वाळूवाहतूकीबाबत परवानगी नव्हती. महसूल पथकाने वाळूने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version