Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तरूणावर कारवाई

रावेर प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोडवरील जलसिंचन परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलीसांनी धडक कारवाई केली असून रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील जलसिंन परिसरात मध्यरात्री रावेर पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना दोन वाजेच्या सुमारास वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रक्टर पोलीसांनी पकडले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याने संशयित आरोपी खान शाहरूख खान अमिद खान (वय-२५) रा. कैसर मजिद मागे मदीना कॉलनी रावेर याच्यावर धडक कारवाई केली. वाळूने भरलेले ट्रक्टर रावेर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अलताफ अली असन अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ईस्माईल शेख करीत आहे.

Exit mobile version