Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील देऊळवाडा ते असोदा रोडवरुन वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंगळवार, २१ मार्च दुपारी ३ वाजता तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे, ४ हजार रुपये किंमतीची एक ब्रॉस वाळूसह २ लाखांचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना देऊळवाडा ते असोदा रोडवर वाळू ची चोरटी वाहतूक होत असल्याची  गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली, त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड,अनिल तायडे,  मिथुन पाटील,  निल मोरे यांच्या पथकाने मंग्रळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुमारास देऊळवाडी ते आसोदा रोडावर विनानंबरचे ट्रॅक्टर थांबविले, यादरम्यान चालकास थांबविण्यास सांगितले असता सदर ट्रॅक्टर वरील चालक याने  ट्रॅक्टर वाहन जागेवरच सोडून पळ काढला. कारवाईत पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली असून याप्रकरणी पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक व मालकाविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहे.

Exit mobile version