Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाल्मीकनगरात विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी | शहरातील वाल्मीक नगरात राहणाऱ्या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते

याबाबत माहिती अशी की, अश्विनी रोहित सपकाळे (वय 22) रा.वाल्मिक नगर, जळगाव ह्या पती रोहित कैलास सपकाळे यांच्यासह सासू, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. आज रविवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पती रोहित आणि सासू हे दोघे नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी विवाहिता घरी एकट्याच होत्या. त्यांनी पाणी तापवण्यासाठी हिटर लावले होते. त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला, त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करुन एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version