Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वारकरी संस्था चालकाकडून ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य

 

पुणे : वृत्तसंस्था । आळंदी परिसरातील  वारकरी संस्था चालकाने शिक्षणासाठी  आलेल्या ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची   बाब समोर आली आहे.

 

आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिवप्रसाद रामनाथ भोकनळ याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

दोन महिन्यांपूर्वी आळंदी परिसरातील श्री माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ११ वर्षीय पीडित मुलाला वारकरी शिक्षणासाठी आई वडिलांनी पाठवले होते. आरोपी शिवप्रसाद  भोकनळ हा मुलांना वारकरी संप्रदायासंदर्भात शिक्षण देत होता. पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याला आईने घरी आणले होते. तेव्हा, भोकनळ यांनी पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. आईने मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता प्रकार समोर आला. शिवप्रसादने अनैसर्गिक कृत्य केल्याचं त्या मुलाने आईला सांगितले.

 

सर्व मुलं हरिपाठ करण्यासाठी जात असतानाच, ११ वर्षीय पीडित मुलाला भोकनळने तुझ्याकडे काम आहे असे म्हणून थांबवले. सर्व जण गेल्यानंतर त्याला एका खोलीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले.पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी देखील शिवप्रसादने दिली. आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Exit mobile version