Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वारंवार धमकी देवून झालेल्या अत्याचारातून युवती गर्भवती; सहा जणांवर गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर एका युवतीवर धमकी देवून वारंवार अत्याचारातून गर्भवती होवून बाळ झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव हरे. येथील २० वर्षीय युवती नातेवाईकांसह राहते. गावातील संशयित आरोपी समिनाबाई तडवी या महिलेने संबंधित युवतीला दबाव टाकून गावातील निंबा सावळे, निलेश, शिवाजी (पुर्ण नाव माहित नाही), गोपाल पाटील, बापु उर्फ संजू आढाव यांनी २० सप्टेंबर २०१९ पासून वेळोवेळी बलात्कार केला. याला प्रतिकार केला असता तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार गोपाल कैलास पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घडला आहे. यात बलात्कारात पिडीत युवती गर्भवती होवून तिला मुलगी झाली. याप्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून सहा जणांवर पिंपळगाव हरे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डीवायएसी भारत काकडे करीत आहे.

Exit mobile version