Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल !

संगमनेर (वृत्तसंस्था) सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल वक्तव्य त्यांना भोवले असून सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला होता. पीसीपीएनडीटी अक्टनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. इंदोरीकर यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद राज्यभर सुरु झाला होता. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात आणि समर्थनात असे दोन गट पडले होते. अनेक संघटनांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत आंदोलनं केली होती. यामुळे इंदोरीकर महाराजांना त्यांचे किर्तनाचे कार्यक्रम देखील रद्द करावे लागले होते.

Exit mobile version