वाणेगावात उद्यापासून अखंड हरिनामाचा गजर सुरू

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वाणेगावात उद्यापासून सलग आठ दिवसांसाठी श्री. शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला अयोध्यातील विश्वेश्वरदास वैष्णव महाराजांची उपस्थिती लाभणार आहे.

तालुक्यातील वाणेगावात २६ फेब्रुवारी पासुन ते ५ मार्च रोजीपर्यंत संगितमय श्री. शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत काकडा आरती, ९ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत श्री. शिवमहापुराण कथा व रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत श्री किर्तन होणार आहे.

संगीतमय श्री शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सरुवात सकाळी ८ वाजता शिवमहापुराण ग्रंथ मिरवणूक काढून होणार आहे. तद्नंतर अयोध्या येथील आचार्य कृष्णमूर्ती ह. भ. प. विश्वेश्वरदास वैष्णव महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन शिवमहापुराण कथा होणार आहे. ता. २७ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. शामसुंदर महाराज (सौंदाणेकर), ता. २८ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. कैलास महाराज वाघ (टेकवाडेकर), ता. १ मार्च रोजी ह. भ. प. सुभाष महाराज (बुलढाणेकर), ता. २ मार्च रोजी ह. भ. प. हिरालाल महाराज (वाडेकर), ता. ३ मार्च रोजी ह. भ. प. विठ्ठल महाराज शिंदे (संभाजीनगर), ता. ४ मार्च ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज (पाळधीकर), ता. ५ मार्च रोजी ह. भ. प. राजेंद्र महाराज (केकत निंभोरा) यांचे किर्तन होणार आहे.

या शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे संयोजक शांतीब्रम्ह भानुदासजी गुरू माऊली महाराज हे असुन दातृत्व साहेबराव दगा पाटील, स्वाती साहेबराव पाटील यांनी केले आहे. सप्ताहात ऑरगन वादक गजानन महाराज लांडे पाटील (बाळापुर), गायक नामदेव महाराज सपकाळ, ऑक्टोपॅड वादक जयंत क्षिरसागर, तबला वादक गजानन महाराज ताथोळ यांचे सहकार्य लाभणार आहे. ता. ५ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत ह. भ. प. मठाधिपती भानुदासजी गुरू माऊली बुवा यांचे परंपरेचे उडीचे किर्तन व रात्री संत माहुजी बाबा यांच्या भव्य पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. सप्ताह यशस्वीतेसाठी राधाकृष्ण देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ मंडळ, तरुण मित्र मंडळ, श्री. संत माहुजी भजनी मंडळाचे सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

Protected Content