Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाणी समाज वधु-वर परिचय मेळावा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा सभागृहात रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री काथार युवा वाणी समाज सेवा संघाच्या वतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करताना समाज गौरव पुरस्कार; समाज जागृती पुरस्कार तसेच मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील समाजातील मान्यवरांना केले गेले. या कार्यक्रमात तब्बल साडेपाचशे वधूवरांनी आपले नावे नोंदवली होती, त्यापैकी साधारण २०० ते २५० इच्छुक उमेदवारांनी परिचय दिला आणि कार्यक्रमाला सुमारे ५००० समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या.

जळगाव जिल्ह्यातील श्री काथार युवा वाणी समाज सेवा संघाच्या वतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, युवा वाणी समाज सेवा संघाच्या अध्यक्ष राजेश वाणी, उपाध्यक्ष सुनिल वाणी, सचिव गणेश डाळवाले, कोषाध्यक्ष शंकर वाणी, वधु वर समितीचे अध्यक्ष मनिष वाणी, उपाध्यक्ष अमोन वाणी, उदय वाणी, योगेश वाणी, अजय कामळस्कर, सुधाकर वाणी यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version