Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाढदिवसाला गरजूंना मदत करा : ना. गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना आपला ५ जून रोजी येणार्‍या वाढदिवसाला समर्थकांनी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये असे सांगत या दिवशी गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस ५ जून रोजी येत आहे. या अनुषंगाने त्यांनी यंदाचा वाढदिवस हा साजरा न करण्याची भूमिका जाहीर केली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ५ जुन रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी यानिमित्ताने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन शिवसैनिक, हितचिंतक व मित्रपरिवाराकडुन केले जाते. पाळधी येथे सकाळपासूनच सर्व क्षेत्रातील हजारो नागरिक व सहकारी ना. गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन करण्यासाठी येत असतात. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर ना. गुलाबराव पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संकटाचा धैर्याने मुकाबला करणे व सेवाभाव जोपासणे हीच वंदनीय शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. कोरोनाच्या संकटात देखील आपण हिमतीने लढा देत आहोत. या काळात वाढदिवस साजरा करणे उचीत नाही. मागिल अडीच महिने टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन असल्याने अनेकजण संकटात आहेत. त्यामुळे शिवसैनिक, पदाधिकारी, हितचिंतक, मित्र परिवाराने माझ्या वाढदिवसानिमित्त कोणताही खर्च करू नये तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याचे टाळावे असे आवाहन
आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. गोरगरीब व मजुर बांधवांना अन्न-धान्य देऊन मदत करावी असेही त्यांनी सांगितले. जनतेची व प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे, सुरक्षित रहाणे हीच आजच्या परिस्थितीत प्राथमिकता आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट दुर झाल्यावर तुमच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध राहीन असेही ना. पाटील म्हणाले.

Exit mobile version