Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाचकाकडून मिळालेला प्रतिसाद प्रेरक : डॉ. दामोदर खडसे

जळगाव, प्रतिनिधी ।  लेखकाला वाचकाकडून मिळालेला प्रतिसाद लिखानासाठी अधिक प्रेरक ठरणारा असतो. असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक डॉ.दामोदर खडसे यांनी केले. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व. डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना डॉ. खडसे बोलत होते. डॉ.कृष्णा पोतदार यांची यावेळी उपस्थिती होती. डॉ.खडसे म्हणाले की, आपल्या भोवताली संवेदना, वेदना पसरलेल्या असतात त्यातून साहित्य जन्माला येते. त्या घटनेची अभिव्यक्ती उमटते तो क्षण मोलाचा असतो. यावेळी डॉ.कृष्णा पोतदार यांनी डॉ. चौधरी यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. व्याख्यानाचे सुत्रसंचालन डॉ.रूपाली चौधरी यांनी केले. वैष्णवी वाघ हीने अभार मानले.  दरम्यान या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गांधीवादी विचारवंत डॉ.विश्वास पाटील यांनी गुंफले. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.मधुलिका सोनवणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उदघाटन झाले. प्रशाळचे संचालक डॉ.मुक्ता महाजन अध्यक्षस्थानी होत्या. तेजपाल चौधरी यांचे पुत्र प्रा.मनोज चौधरी, डॉ.ए.बी.पाटील यांचीही उपस्थिती होती. दुसरे पुष्प हिंदी साहित्यिक डॉ.श्रीराम परिहार यांनी गुंफले. प्रा.मधु खराटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version