Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघ नगरातील संसर्गग्रस्त परिसर सील; परिसरात फवारणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगरातील एकाच कुटुंबातील १५ जण कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रात्रीच या परिसरात फवारणी करण्यात आली आहे. या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून येथे उपाययोजना करण्यात येत आहेत.

याबाबत वृत्त असे की, काल सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील वाघ नगर भागातल्या जय हनुमान नगर या कॉलनीतील एकाच कुटुंबात तब्बल १५ जण कोरोना बाधीत असल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने परिसरात धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे परिसरात फवारणी करण्यात आली असून या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तर संसर्गग्रस्त कुटुंबाचा रहिवास असणारा भाग सील करण्यात येत आहे.

जय हनुमान नगर भागात रहिवास असणार्‍या एकाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याला कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने त्याच्या कुटुंबियांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यातील १५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या सर्वांवर आधीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर रात्रीच त्यांचा निवास असणारा भाग हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून याला सील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

Exit mobile version