Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघ नगरातील जिजाऊ नगरात बंद घर फोडले; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । वाघ नगर परिसरातील जिजाऊ नगरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तालुका पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनेश खिवराज लखारा (वय-३५) रा. जिजाऊ नगर, आव्हाणे शिवार जळगाव हे कुटुंबियासह राहतात. सोनार काम करून उदरनिर्वाह करतात. २८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान ते दिवाळी निमित्त एक महिन्यासाठी गावाला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. बंद घर पाहून संधी साधत घराचे कडी कोयंडा तोडून घरातील ३७ हजार ६०० रूपयांचे दागिने आणि ६ हजार रूपयांची रोकड असा एकुण ४३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २९ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. याप्रकरणी दिनेश लखारा यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिश हाळनोर करीत आहे.

Exit mobile version