वाघरे परिवाराने दिला “बेटी बचाव – बेटी पढाव”चा संदेश..

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील रामदेवजी बाबा नगर येथे वास्तव्य असणाऱ्या वाघरे परिवाराने मुलीच्या जन्मदिनी मित्रपरिवारात व शहरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या या आनंदोत्सवात शहरवासीयांनी सहभाग घेऊन वाघरे परिवारला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

वाघरे परिवारातर्फे मुलीच्या जन्मदिनी पेढे पाकिटावर राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विद्येची खरी देवता – भारतातील प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले, मुस्लिम समाजातील प्रथम शिक्षिका फातिमा शेख, आदिवासी वीरांगना झलकारीदेवी, त्यागमूर्ती माता रमाई या महामातांचे फोटो देऊन “बेटी बचाव – बेटी पढाव” चा क्रांतिकारी संदेश देण्यात आला. वशांचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे अशी मानसिकता असणाऱ्या लोकांसाठी हा डोळे उघडणारा एक सकारात्मक संदेश कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी मार्गक्रमण करणारे सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी पापाशेठ वाघरे, सुरजसिंग वाघरे, व पो.कॉ. सुमेरसिंग वाघरे यांनी आपल्या पारिवारात मुलीचा जन्म झाल्या बद्द्लपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.शहरातील प्रत्येक मुलीने या सर्व महामातांचे आदर्श घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे. या महामातांचे जीवन कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी व ऊर्जा स्रोत आहे, असे प्रतिपादन सुमेरसिंग वाघरे यांनी केले. या क्रांतीकारी निर्णयामुळे वाघरे परीवाराचे शहरात नगरवासीयांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content