Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघडू येथून भजनासाठी गेलेला वयोवृद्ध बेपत्ता!

चाळीसगाव, प्रतिनिधी | भजनासाठी जाऊन येतो असे सांगून गेलेला वयोवृद्धा हरविल्याची घटना तालुक्यातील वाघडू येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथील आनंदा गोबजी पाटील (वय-८०) यांना भजणाची आवड असल्याने ते १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता घरच्यांना वेरूळ ता. खुलताबाद जि. औरंगाबाद येथे भजणासाठी जाऊन येतो असे सांगून गेला. मात्र तो आजपावेतो घरी परतला नाही. यावर घरच्यांनी वेरूळ परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु आनंदा गोबजी पाटील हे मिळून आले नाही. दरम्यान मुलगा सुदाम आनंदा पाटील (वय-४८) हा अशिक्षित असल्याने हरवल्याची फिर्याद पोलिसात द्यावी लागते का? हे माहीत नसल्याने आज रोजी त्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Exit mobile version