Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघझीरा आदीवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहीत्य वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका आणि समाज सुधारक फातिमा शेख यांच्या १९२ व्या जयंती निमित्त किनगाव येथील महाविद्यालयाच्या वतीने वाघझीरा आदीवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहीत्य वाटप करण्यात आले.

संस्थाध्यक्ष हाजी रमजान अमीर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष संचालक सचिन तडवी यांनी दुर्गमभागातील सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळा वाघझिरा येथे ईयत्ता १२ वी च्या वर्गात प्रवेशीत असलेल्या गोरगरीब आदिवासी विधार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप कारण्यात आले.

या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सचिन तडवी यांचे मित्र असलेल्या एक दलित बहुजन मातंग समाजातील व हाथाला मिळेल ते काम करून भटकंती करून आपल्या परिवाराची पोटाची खळगी भरणाऱ्या अशा प्रकारे आपला स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या अशा अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्ती भिमा चव्हाण यांच्याहस्ते अपेक्षित प्रश्न संच वाटप करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करून दिला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार महाजन यांनी मानले. कार्यक्रमा प्रसंगी अमीर प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महविद्यालयाचे खजिनदार व संचालक अजित तडवी, रफिक तडवी, संचालक मंडळ व शिक्षण प्रेमी, पालक, शाळेचे विध्यार्थी, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक किशोर महाजन, शिक्षक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version