Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वांद्रे गर्दी प्रकरणः ‘एबीपी माझा’चे पत्रकार राहुल कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात

 

मुंबई (वृत्तसंस्था) अडकलेल्या मजुरांना गावी नेण्यासाठी ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याचे वृत्त दिल्यांनतर वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात काल संध्याकाळी उसळलेल्या गर्दी प्रकरणी पोलिसांनी ‘एबीपी माझा’चे पत्रकार राहुल कुलकर्णीच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

 

 

कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने काल सकाळी दाखवले होते. दक्षिण मध्य रेल्वेने काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचे राहुल कुलकर्णींनी वार्तांकन करताना म्हटले होते. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, विशेष म्हणजे रेल्वेने परिपत्रक काढून आणि ट्विट करुन कुठलिही विशेष रेल्वे चालविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version