Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वहिनीचा विनयभंग करणाऱ्या चुलत दीराला अटक

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणारी २५ वर्षीय विवाहितेचा तिच्या चुलत दिराकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयिताला पोलीसांनी अटक केली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, यावल तालुक्यातील २४ वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. गुरूवार ७ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान विवाहिता घरी असतांना तिचा चुलत मानलेला दिर याने तिच्या बेडरूममध्ये येवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दीराला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सोनवणे करीत आहे.

Exit mobile version