Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वसंतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सखुबाई पाटील यांची बिनविरोध निवड

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सखुबाई पाटील यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदासाठी निवडणूक सरपंच वत्सला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बबन वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यी प्रीती जगताप, अनिता चिमणकारे, अरूणा सोनवणे, भागवत पवार, सखुबाई पाटील, गजमल पवार, भिमराव निकम आदी उपस्थित होते.

उपसरपंचपदासाठी सखुबाई पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषीत करण्यात आली. निवडणूक कामी शिपाई रामेश्वर चव्हाण, उमेश पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी उपसरपंचपदी सखुबाई पाटील यांची निवड झाल्याने त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रमेश पाटील, आत्माचे पी.के.पाटील, जळकेचे पोलीस पाटील संजय चिमणकारे, ज्ञानेश्वर चव्हाण, नेमीचंद जैन, शिवाजी पाटील, भास्कार सोनार, रविंद्र पाटील, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version