Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वऱ्हाडाची लक्झरी बसला अपघात ; एक महिला ठार

 

बुलडाणा (वृत्तसंस्था) औरंगाबाद येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन नांदुऱ्याला जाणाऱ्या लक्झरी बसला झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर २६ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

 

या अपघातात नयना नंदकुमार कुळकर्णी (४६, औरंगाबाद) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन नांदुऱ्याला जात होता. बुधवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास चिखली-जालना महामार्गावरील अंचरवाडी फाट्यावरील वळणावर टँकरला हूल देण्याच्या प्रयत्नात बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर लक्झरी उलटली. या अपघातात एक महिला ठार, २६ वऱ्हाडी जखमी झाले.

Exit mobile version