Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वराड बु ॥ येथे महिलेचा विनयभंग; आठ जणांवर गुन्हा

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वराड बुद्रुक येथील ४० वर्षी महिलेचा दारूच्या नशेत एकान विनयभंग करून मुलगा आणि दीर यांना लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील वराड बुद्रुक येथील ४० वर्षीय महिला मुलासह नातेवाईकांसह राहतात. गावातील दत्तू अवचित महाजन याने महिलेजवळ येवून माझ्याच्या लग्ना जास्त लोक आले असे इतरांना सांगत असल्याच्या संशयावरून महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला तर महिलेच्या मुलाला तुषार भगवान पाटील, भिकन लक्ष्मण पाटील, कृष्णा राजेंद्र पाटील, बादल मधूकर पाटील, निलेश शामा महाजन, राकेश एकनाथ महाजन आणि सचिन दत्तू महाजन सर्व रा. वराड ता.धरणगाव जि.जळगाव यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तर चुलत दीर भांडणसोडविण्यास आला तर त्याला देखील लाकडी दांडूक्याने शिवीगाळ मारहाण केली. विवाहितेच्या फर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ  गजानन महाजन करीत आहे. 

 

Exit mobile version