Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरसाडे येथील ग्रामपंचायत सदस्य अपात्र

 

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वरसाडे प्र. पा. ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील वरसाडे प्र.पा. येथील डॉ. नितीन वर्जन चव्हाण हे सन – २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य निवडून आले होते. परंतु त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन वास्तव्यास असल्याने वरसाडे प्र. पा. येथीलच रहिवासी पवन तुकाराम पवार यांनी १३ ऑगस्ट २०२१ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज /३) अन्वये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मागील एक वर्षापासून कामकाज सुरु होते. या तक्रारीची दखल घेऊन संपूर्ण चौकशीअंती ग्रामपंचायत विवाद क्रमांक २५ / २०२२ ला आदेशानुसार दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी कामकाज होऊन ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र ठरवले आहे. याप्रकरणी अर्जदाराकडून अॅड. शाम जाधव यांनी काम पाहिले.

Exit mobile version