Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगाव शहराच्या रस्त्यावर मोकाट जनावरांचा कळप (व्हिडिओ)

वरणगाव, दत्तात्रय गुरव । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा सध्या सुळसुळाट पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

 

वरणगाव शहरे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदेचे गाव आहे. नॅशनल हायवे क्रमांक ६  या गावाच्या मध्यभागातून जातो.  शहरातील बस स्टॉप चौकामध्ये मोकाट जनावरे घोळका करून बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी या चौकांमध्ये पहावयास मिळत आहेत. पोलीस प्रशासनाला याबाबत विचारले असता हे नगरपालिकेचे काम असल्याचे पोलीस सांगतात व नगरपालिका अधिकाऱ्यांना विचारले असता नगरपालिकेचे अधिकारी हे आमचे काम नाही असे हात झटकून मोकळे होतात. त्यामुळे या मोकाट जनावरांना आळा कोण घालणार ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, चौकाचौकांमध्ये घोळका करून बसलेल्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे.

 

 

 

Exit mobile version