Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगाव येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीची सायकल रॅली

 

वरणगाव : प्रतिनिधी ।  येथे महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सायकल रॅली काढण्यात आली

 

नगरपालिकेच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये वरणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या मोदी सरकारच्या विरोधात या रॅलीमध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली रॅलीचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी यांनी केले बस स्टॅन्ड चौकामध्ये चुलीवर की स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील उपस्थित होते  वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांना निवेदन देण्यात आले

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी,  भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे , माजी नगरसेवक सुधाकर  जावळे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस  जिल्हा उपाध्यक्ष वाय.  आर . पाटील , राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी , माजी नगरसेवक रवी सोनवणे,  माजी नगरसेवक विष्णू खोले , अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार , ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते , महेश सोनवणे, राजेश इंगळे  ,  इफ्तार खा मिर्झा यांच्यासह   असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

 

Exit mobile version