Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगाव येथे भरदिवस घरफोडी ; ६७ हजार रुपयाचा ऐवज लंपास

 

वरणगाव, प्रतिनिधी । येथिल रेणुका नगरमधिल फॅक्ट्री कर्मचारी महिला कामावर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांवर भरदिवसा डल्ला मारला. हि घटना सदर महिला कामावरून घरी परत आल्यावर उघड झाली.

याबाबतचे वृत्त असे की, येथील रेणुका नगरमधे राहाणाऱ्या प्रतिभा नितीन वराडे यांना अनुकंपा तत्वावर वरणगांव फॅक्टरीमधे नोकरी लागली आहे. सकाळी ७ वाजेपासुन त्या कामावर गेल्या होत्या. त्या सायंकाळी ५ चे सुमारास घरी आल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले त्यांनी शेजारी असलेले संजीव कोलते यांना बोलवले. त्यांनी लागलीच वरणगांव पोलीस स्टेशनला फोन करुन घटनेबाबत माहिती दिली. प्रतिभा वराडे यांनी फिर्यादीमधे ३ तोळयाची सोन्याची पोत व ७ हजार रोख असा एकूण सदुसष्ठ हजार रूपयाचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार नोंद केली. तर दुसऱ्या घटनेत मकरंद नगरमधील विशाल गजानन जोशी यांचे फिर्यादीवरून त्यांचे घरातील १२ ग्रॅम वजनाच्या ३ लक्ष्मीनारायणाच्या प्रतिमा चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे. चोरीचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने फक्त महामार्गावरील विष्णू प्लायच्या दुकानापर्यंत मार्ग दाखविला. दोन्ही घटनांचा तपास पी.एस.आय. सुनिलवाणी व गणेश शेळके करीत आहेत. लागोपाठ चोरीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version