Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात 157 तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

वरणगाव  : प्रतिनिधी । शहरातील सिद्धेश्वर नगरातील प्रभाग क्रमांक 18 मधील 157 तरुणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला 

 

या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन तसेच मुस्लिम समाजाचे नेते जाफरअली मकसूदअली (हिप्पी शेठ) यांच्यावर विश्वास ठेऊन मंगळवारी  सिद्धेश्वर नगरात झालेल्या  प्रवेश सोहळा कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.

 

कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख समाधान महाजन होते. प्रमुख अतिथी जिल्हा नियोजन समिती सदस्य ऍड. मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख अफसर खान, शिक्षक सेनेचे ईलीयास खान, कार्यालय प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे , जिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे , भुसावळ शहरप्रमुख निलेश महाजन, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, पं. स सदस्य विजय सुरवाडे, ऍड. कैलास लोखंडे, हिप्पी शेठ, कस्तुराबाई सुरवाडे, योगिता सोनार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 

संतोष सोनवणे, ईलियास , प्रा. उत्तम सुरवाडे, अफसर खान,  ऍड.मनोहर खैरनार या सर्वांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कार्य आणि शिवसेना पक्षाचे काम हे संपूर्ण राज्यासह देशाने बघितले. उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलाही जातीभेद, नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणारांची संख्या वाढत असल्याचे सांगितले.

 

जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी आपल्या खास शैलीत 30 वर्षांपासून भाजपची सत्ता असूनही सत्ताधारी यांनी सिद्धेश्वर नगरचा दलित वस्ती निधी दुसरीकडे  वळवून  हा परिसर भकास करून ठेवला आहे. पाच वर्षात इतक्या कोटीचे कामे केली म्हणता मंग या भागात लाईट, गटार, पाणी या मूलभूत सुविधा का मिळाल्या नाहीत? येथील नागरिकांना मूलभूत सुविधा  नसल्याचा घणाघात जिल्हाप्रमुख महाजन यांनी केला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सईद मुल्ला, बाळू माळी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, राजु माळी, ताज शहा, अब्रार खान, राहुल वंजारी, अरबाज पहेलवान, पवन माळी, आबा सोनार, अमर सोनार, दिपक पाटील, अस्लम शेख यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन निलेश ठाकूर, संतोष सोनवणे यांनी केले.

 

Exit mobile version