Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात तरुणांकडून पोलिसावरच हल्ला..! तीन अटकेत

वरणगाव प्रतिनिधी । येथे एका पोलिसावरच जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांव्यक्तिरिक्त एक संशयीत अल्पवयीन आरोपी असल्याची माहिती वरणगाव पोलीस सूत्रांनी दिली आहे.
शहरातील तपतकठोरा रस्त्यावर तरुणाचा घोळका रस्त्यावर बसलेला होता. त्यावेळी पोलिस कर्मचारी मनोहर पाटील यांनी त्यांना हटकले असता चार ते पाच तरुणांनी गाडीला लाथ मारली आणि पोलिस कर्मचारी श्री.पाटील यांना काठीने जोरदार मारहाण केल्याची घटना घडली, त्यात ते जखमी झालेत. संचारबंदी असल्याकारणाने गर्दी पांगविण्याची जबाबदारी वरणगाव पोलिस बजावत असताना शहरातीत तपतकठोरा रस्त्यावर गस्तीवर असलेले मनोहर पाटील यांनी तरुणांचा घोळका दिसल्याने जमाव पांगवण्याच्या उद्देशाने तरूणांना ‘गर्दी का करता ? आपापल्या घरी जा? येथे थांबू नका’ असे सांगितल्याने काहींना या गोष्टीचा राग आला व त्यांनी त्यांच्या गाडीला लाथ मारुन खाली पाडून त्यांच्याच काठीने मारहाण करून डोक्याला दुखापत केली. या घटनेत पोलिस कर्मचार्‍यावर हल्ला झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. श्री पाटील हे रजेवर गेले आहेत. त्यांच्या डोक्याला तब्बल  ९ टाके पडले आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली असून उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एक आरोपी अल्पवयीन आहे.
तीन आरोपींना अटक : एकाला समज देवून सोडले आहे.
सैय्यद शकील उर्फ अरबाज सय्यद, सय्यद अलीम सय्यद सलीम व सय्यद मुस्तकीन सय्यद सलीम या तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एका 17 वर्षीय आरोपीस ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यास समज देवून सोडून देण्यात आले आहे. याप्रकरणी वरणगावं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Exit mobile version