Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

वरणगाव प्रतिनिधी । शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच्या कपीलनगराजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली  जखमी तरूणास वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

राष्ट्रीय महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. भुसावळ तालुक्यातील कपिलनगर येथून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरूणाला वरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

Exit mobile version