Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरणगावला संतोषभाऊ माळी मित्र परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

वरणगाव, प्रतिनिधी   ।   राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा क्रांतिसूर्य महात्मा फुले बहुउद्धेशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष बळीराम माळी यांच्या ४२  व्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले नगरमध्ये माळी सामाज पंच आणि भाजप, शिवसेना, काँग्रेस पक्षातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संतोषभाऊ माळी मित्र परिवारातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

 

आज शनिवार १२  जुन  रोजी माळी सामाजाचे पंच, क्रांतीसूर्य महात्मा फुले बहूउद्धेशिय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्र परिवारातर्फे महात्मा फुले नगरातील महात्मा फुले सामाजिक सभागृहाच्या परिसरात ऑक्सिजनसह सावली देणारे वड, पिंपळ, निंब, करंज, आंबा, बदाम, चिंच असे एकूण ४२ वृक्ष लावण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाला माळी समाज अध्यक्ष संजय माळी, जेष्ठ मार्गदर्शक सुभाष काशिनाथ माळी, पंच नाना माळी, गोविंदा माळी, रामदास माळी, भगवान माळी, सेक्रेटरी नाना माळी, वसंत माळी यांच्यासह वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद हिप्पीशेठ,  जिल्हा संघटक विलास मुळे, सुभाष चौधरी, सईद मुल्लाजी, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी, मुस्लिम अन्सारी तसेच छत्रपती ग्रुपचे संदीप वाघ, प्रकाश मराठे, गोलू निंबाळकर यांच्यासह संतोषभाऊ मित्र परवारातील सचिन माळी, किरण माळी, बाळा माळी, टिनू माळी, विजय माळी, विवेक माळी, सागर माळी, पवन माळी, भैय्या माळी, भुषण माळी, निलेश माळी, दिपक माळी, मनोज माळी, किरण माळी, अक्षय माळी ईश्वर माळी, फरहाणन शेख, सीदिक खान यांच्यासाह अनेकांनी परिश्रम घेतले.  वृक्षरोपणसाठी डॉ. रविंद्र माळी यांच्या कल्पतरू निसर्ग सेवा टीमने सहकार्य केले.

 

४२  वृक्ष वाढविण्याचा घेतला संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संतोष माळी आपला माणुस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवारातर्फे लावण्यात आलेले वृक्ष वाढविण्याचा संकल्प यावेळी संतोष माळी यांच्यासासह त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे.

Exit mobile version