Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वरखेडी – भोकरी येथे युवक काँग्रेस शाखेचे उद्घाटन (व्हिडीओ)

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील भोकरी गावात युवक काँग्रेसच्या शाखेच्या  फलकाचे अनावरण युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

भोकरी येथे युवक कॉंग्रेसच्या शाखा उद्घाटन  युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाचोरा तालुक्याच्या विविध पदांवर युवकांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अविनाश भालेराव,शहराध्यक्ष अमजद पठाण, माजी उपनगराध्यक्ष मुख्तार शहा, माजी नगरसेवक नंदू सोनार, सरचिटणीस पाचोरा प्रताप पाटील, विधानसभा अध्यक्ष शकील शेख,तालुकाध्यक्ष रऊफ काकर,  प्रशांत  माल खेडे,  भरत बडगुजर, अविनाश पवार, कपिल पाटील, सरपंच मौलाना   अरमान, मा सरपंच रशीद भाई, शफीजी , मा सरपंच इरफान भाई,  शफी कादर उपसरपंच, अकील अहमद उपसरपंच, डॉ. अश्फाक काकर, हमीद भाई, आदी  जेष्ठ नेते, युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विधानसभा अध्यक्ष शकील शेख व तालुकाध्यक्ष राऊफ काकर व संपूर्ण पाचोरा युवक काँग्रेसच्या टीमने कामकाज पाहिले.

 

Exit mobile version